धनाजी नाना महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन

danaji colloge

फैजपूर प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात दि 30 जुलै रोजी युवती सभेचे उद्घाटन रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट महाविद्यालय जळगावच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांनीशी ‘वुमेन्स लीडरशिप’ या विषयवार हितगुज साधत असतांना त्या म्हणाल्या, आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर आपली लिडरशिप अवलंबून असून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला. काव्या विश्वनाथन आणि इंदिरा लूई यांच्या जीवनातील काही प्रसंगही अतिशय रंजक पद्धतीने सांगितले. शिक्षण आणि करियर बरोबरच सुदृढ़ कुटुंब बनविण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाचेही लीडर आहोत, ही जाणीव विद्यार्थिनींना त्यानी करून दिली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी हे होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थिनींनी अधिक सक्षम बनून यशाचा मार्ग शोधण्यास सांगितले. तसेच विद्यार्थी विकास प्रमुख डॉ.गोपाळ कोल्हे व प्रा.डॉ.सिंधू भंगाळे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.सविता वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शुभांगी पाटील तर आभार प्रा.डॉ.सीमा बारी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा.डॉ.कल्पना पाटील, प्रा. डॉ.सरला तडवी, प्रा.डॉ. जयश्री पाटील, प्रा.पल्लवी पाटील, प्रा. नाहिदा कुरैशी, प्रा.ललिता पाटील, प्रा. किरण फेगड़े, प्रा.चिन्मया भंगाळे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content