कोरोना : दहीवदच्या ‘त्या’ क्लिनरच्या संपर्कातील १९ जणांना क्वारंटाइन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कांदे भरण्यासाठी आंध्र प्रदेशातून आलेल्या एका ट्रकच्या क्लीनर कोरोना पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने क्लिनच्या संपर्कात असलेल्या कांद्याची ट्रक भरणारे १९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान दहीगावात नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.

दहिगावात या कोरोना बाधित क्लीनरच्या संपर्कात आलेल्या व कांद्याची ट्रक भरणार्‍या १७ मजुरांसह तोलकाट्यावरील दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून दहिगावात सॅनिटायजेशन केले जात असून ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, यावल तालुका ग्रामीण रुग्णालयासह तालुका आरोग्य प्रशासनाकडे पीपीई कीट नसल्याने अशाही अवस्थेत आरोग्य कर्मचारी काम करीत असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील दहीगाव येथे आंध्रप्रदेशातून कांदा भरण्यासाठी ट्रक आला होता. याच ट्रकवरील क्लिनर कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाला. दरम्यान क्लिनर अद्याप पसार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ए.पी.एक्स ९९६९ या क्रमांकाचा ट्रक दहिगावात शुक्रवारी कांदे भरण्यासाठी आला होता.

Protected Content