चिंताजनक : मुंबईत २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील वॉकहार्ट हॉस्पीटलमधील २६ नर्स आणि ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर बीएमसीने हॉस्पीटलला क्वारेंटाइन एरिया म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.

एका हॉस्पीटलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संक्रमण कसे पसरू शकते?. यामुळे प्रशासन चिंतेत आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या २७० पेक्षा जास्त कर्मचारी आणि डॉक्टरांच्या चाचण्या केल्या जात आहेत. औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एका ३८ वर्षीय पुरुष नर्समध्येदेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, यानंतर हॉस्पीटलच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आज संध्याकाळपर्यंत त्यांचे रिपोर्ट येणार आहेत. दरम्यान, राज्यात आज सकाळी नवीन ३३ रुग्ण आढळून आले. यासोबत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७८१ झाला आहे. तर राज्यातील मृतांचा आकडा ४६ वर गेला आहे.

Protected Content