शब-ए-बारात ची नमाज घरीच अदा करा : पोलिसांचे आवाहन



जळगाव, प्रतिनिधी : गुरुवार ९ एप्रिल रोजी येणाऱ्या शबे बारात ची नमाज मुस्लिम समाजाने आपापल्या घरी अदा करावी व कोणीही कब्रस्तान मध्ये येऊ नये अशी विनंती एमआय डीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांनी केली आहे.

सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जळगाव मुस्लिम कब्रस्तान समिती तसेच तांबापुर येथील सुंनी मशिदीचे प्रमुख यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यात पोलिसांतर्फे विनंती करण्यात आली.
सदर बैठकीत इदगाह कब्रस्तान चे जनरल सेक्रेटरी फारुक शेख, सुंनी मशीद चे प्रमुख शरीफ शाह बापू तसेच ट्रस्टचे अश्फाक बागवान ,अनिस शेख, ताहेर शेख, मजहर खान, एडवोकेट अमीर शेख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाज हा शबे बारात हा आपला सण घरीच साजरा करतील व घरातच रात्रभर नमाज अदा करतील कोणीही कब्रस्तान मध्ये जाणार नाही अशी हमी या मुस्लिम समाजाच्या प्रमुखांनी पोलिसांना दिलेली आहे. पोलिसांनी सुद्धा विनंती केली असल्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कोणीही कब्रस्तान मध्ये अथवा मसजिद मधे जाऊ नये असे आवाहन मुस्लिम समाज व पोलीस दलातर्फे करण्यात आलेले आहे. या ऊपर ही कोणी जबरदस्ती करून कब्रस्तान व मस्जिद मधे आल्यास त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्यात येईल असे सुद्धा ठरले आहे.

Protected Content