साने गुरूजी कॉलनीत योग दिनानिमित्त ‘योगा व वृक्षारोपण’ कार्यक्रम उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । जागतिक योग दिनानिमित्त पतंजली योग समिती व निसर्ग पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यामानाने योग व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काही उपस्थित नागरीकांना योगाचे प्रात्यक्षिके करून त्याचे महत्वा सांगण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, आज २१ जून अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात विविध संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील पतंजली योग समिती व निसर्ग पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमानाने योग व वृक्षारोपण करण्यात आले.  याप्रसंगी जळगाव जिल्हा भारत स्वाभिमान महामंत्री जयश्री पाटील व जळगाव जिल्हा प्रभारी मनिषा पाटील यांचे खूप छान असे मार्गदर्शन व योग बद्दल माहिती व योगा शिकवण्यात आला. त्यांच्याकडून चांगली माहिती देण्यात आली.  पर्यावरण सखी मंच तर्फे राज्य समन्वयक नानासाहेब पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कडुलिंब, आवळा, जांभूळ असे रोप देऊन सत्कार केला. पतंजली योग समिती यांच्याकडून नेहा जगताप यांची पतंजली जिल्हा मीडिया प्रभारी म्हणून पद नियुक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी  पतंजली योग समिती व निसर्ग पर्यावरण सखीमंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content