Home Cities एरंडोल गांधीपुरा विकासो चेअरमनपदी ताराचंद मराठे तर व्हा.चेअरमनपदी प्रतिभा वंजारी

गांधीपुरा विकासो चेअरमनपदी ताराचंद मराठे तर व्हा.चेअरमनपदी प्रतिभा वंजारी

0
53


एरंडोल प्रतिनिधी । येथील गांधीपुरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदाची गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक होऊन विजयी उमेदवार ताराचंद मराठे तर व्हॉईस चेअरमनपदी प्रतीभा वंजारी यांची एकमताने निवड करण्यात आली. 

उमेदवार ताराचंद मराठे यांना १० मते मिळाली तर पराभूत उमेदवार विजय नाईक यांना २ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी संजय डी.पाटील यांनी काम पाहीले तर संस्थेचे सचिव रामकृष्ण गायकवाड यांनी त्यांना सहकार्य केले. निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बन्सीलाल लोहार,नथ्थु चौधरी,दशरथ चौधरी,अशोक साळी,मदन भावसार,धनंजय खैरनार,सुभाष वंजारी,नाना बडगुजर,चिंतामण पाटील सुनिल चौधरी,ईश्वर बि-हाडे, प्रविण पाटील, वासुदेव वंजारी, शेखर पाटील, सोसायटीचे स्वस्त धान्य वितरक ज्ञानेश्वर घुगे आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound