यावल तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहिर

यावल प्रतिनिधी । यावल तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात अध्यक्षपदी  जितेन्द्र फिरके तर सचिवपदी दिलीप संगेले  यांची निवड करण्यात आली. महासंघाची सभा यावल तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष तालुका क्रिडा समन्वयक मुख्याध्यापक के. यु. पाटील यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली

यासभेत यावल तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ संलग्न असलेल्या यावल तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची कार्यकारिणी बैठक माध्यमिक विद्यालय विरोदा येथे बैठक संपन्न होवुन निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी जितेंद्र फिरके तर सचिवपदी दिलीप संगेले यांची व कार्यकारिणीची सर्वानुमते निवड  निवड करण्यात आली.

तालुका युवा कार्यकारिणी याप्रमाणे

अध्यक्ष- जितेंद्र अर्जुन फिरके डॉ. डी. के.सी. विद्यालय डाभुर्णी, उपाध्यक्ष ललित अनंत बढे  (अट्रावल), कार्याध्यक्ष शे. साजिद शे.मेहबुब (यावल), सचिव- दिलीप बिहारी संगेले इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव सहसचिव रमेश शंकर जावळे (भालोद) योगेश गोवर्धन कोळी (हिंगोणा), खजिनदार- पर्यवेक्षक कमलाकर रामदास सोनवणे (सातोद), संघटक- सैय्यद अंश्पाक अली मुस्तफा (साकळी) सल्लागार- मुख्याध्यापक किशोरकुमार उत्तमराव पाटील

(विरोदे), मुख्याध्यापक उमाकांत जनार्दन  महाजन (डांभुर्णी)कार्यकारिणी सदस्य- वसीम सलीमखान (मारूळ) मोहम्मद फैजल लतिफखान (साकळी)युवराज वाय. पाटील (चुंचाळे)ए. एस. काळकर  (अकलुद), निळकंठ चोलदास पाटील(आमोदे) प्रवीण  पुरूषोत्तम महाजन(बामणोद)  यांची निवड करण्यात आली.

मान्यवरांकडून अभिनंदन

नूतन कार्यकारिणीचे  जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर, सचिव राजेश जाधव, पदाधिकारी व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे संस्थापक विजयकुमार पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, प्राचार्य अशोक पाटील यांनी अभिनंदन केले तर सर्व समीती सदस्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट प्रकारे संघटनेच्या कार्याला सुरुवात केली जाईल असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष जितेंद्र फिरके व सचिव दिलीप संगेले  यांनी केले.

Protected Content