‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अपंगांना मतदानात मदत

91f7ffc2 cb62 41f9 83a3 c3dc2cda8727

भुसावळ (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत यंदा लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे अंध, अपंग, वृद्ध व आजारी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी मदत करण्यात आली. सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर तथा तहसीलदार सतीश निकम ह्यांनी संस्कृती फाउंडेशनला ही जबाबदारी दिलेली होती.

 

ही जबाबदारीला पूर्ण करीत संस्कृती फाउंडेशनने शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर तीन स्वयंसेवक नेमले होते. ह्यात नगरपालिका शाळा क्र. १, द. शि. विद्यालय, के. नारखेडे विद्यालय, संत गाडगेबाबा विद्यालय, ए. जी. सी. विद्यालय इत्यादी विद्यालयात स्वयंसेवक अपंग, वृद्ध अंध मतदारांची सेवा करण्यासाठी तत्पर होते. तसेच तालुक्यातील वांजोळा, वराडसिम, बेलव्हाड, सुनसगाव, गोजोरा, पिंपळगाव खुर्द, कुर्हे पानाचे, खडका, किन्ही, खंडाळा, मोंढाळा, दिपनगर, ओझरखेड, बोहर्डी, वरणगाव, आचेगाव, फेकरी, साकरी, फुलगाव, शिंदी, इत्यादी प्रत्येक गावांमध्ये जाऊन स्वयंसेवकांनी अपंग मतदारांना चारचाकी गाडीत बसवून मतदान करवून घेतले. ह्या उपक्रमात निवडणूक प्रशासनाकडून संस्कृती फाउंडेशनला १० चारचाकी वाहने देण्यात आली होती. त्यातील सहा चारचाकी वाहने हे तालुक्यातील गावांमध्ये जाऊन मदत करीत होती तर चार वाहने शहरातील अपंग बांधवांना मदत करीत होती. सकाळी ७.०० वाजेपासून तर अगदी निवडणुकीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत स्वयंसेवकांनी निवडणूक प्रशासनाला निस्वार्थ सेवा दिली.

संस्कृती फाउंडेशनच्या ४५ स्वयंसेवकांनी त्यासाठी परिश्रम घेतले. त्यामध्ये शहरातील मतदान केंद्रांवर नम्रता चांडक, कोमल बोरणारे, सिमा आढळकर, गितीका कोरी, यामिनी महाजन, प्रियंका पाराशर, तेजस गांधेले, आकाश धनगर, तेजस्विनी कापडी, पल्लवी डांबरे यांनी मदत केली. तसेच तालुक्यातील गावात रणजितसिंग राजपूत, अश्फाक तडवी, अजित गायकवाड, तुषार गोसावी, सोहिल कच्ची, मंगेश भावे, पराग चौधरी, पवन कोळी, हर्षल येवले, राहूल चौधरी, सावन चौहान, सोनू कोळी इत्यादी स्वयंसेवकांना मेहनत घेतली. हा संपूर्ण उपक्रम संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पार पडला. या उपक्रमासाठी स्वयंसेवक एक महिन्यापासून परिश्रम घेत होते. बी.एल.ओ.कडून अपंगांची यादी बनवून त्यांना मदत केली गेली, त्याबद्दल निवडणूक प्रशासनाने त्यांचेही कौतुक केले आहे.

Add Comment

Protected Content