चाळीसगावात किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे उद्या बेमुदत बंद

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र नियमांचे पालन करून दुकान सुरू असताना पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत असलेल्या एका तोतयाने वसुली दरम्यान व्यापाऱ्यांशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे उद्या बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. 

सध्याच्या भयंकर परिस्थितीत  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्याचबरोबर अनेक किराणा दुकानदारांनी घरपोच सेवा देखील सुरू ठेवली आहे. पोलिस प्रशासन व नगरपालिका अधिकारी यांनी सांगितलेल्या प्रमाणे व्यापार उद्योग केला जात आहे. असे असतानाही मात्र  नगरपरिषदेचा एक कर्मचारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत येऊन व्यापाऱ्यांशी हुज्जत घालीत शिवीगाळ करताना आढळून आला आहे. याबाबत असोशिएशनचे संचालक अजय वाणी यांनी सांगीतले आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यांची व किराणा व्यावसायिक यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याने या त्रासाला कंटाळून किराणा दुकानदार असोसिएशनने दिनांक २९ एप्रिल रोजी बेमुदत किराणा दुकान बंद ठेवण्याचे ठरवले आहे. किराणा दुकान बंद झाल्याने लोकांचे दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे कठीण होणार असल्याने याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशी भूमिका किराणा भुसार व्यापारी असोसिएशन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व शासनाला दिले आहे. यावेळी अध्यक्ष जितेंद्र देशमुख, सचिव शामराव शिरोडे ,संचालक अजय वाणी, व्यापारी जितेंद्र येवले तसेच किराणा भुसार व्यावसायिक व्यापारी असोसिएशन पदाधिकारी उपस्थीत होते.

 

Protected Content