स्वातंत्रसेनानी पी. के. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । स्वातंत्रसेनानी, सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच अण्णासाहेब पी.के.पाटील व्यापारी संकुलनाचे उद्घाटन खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

पी.के.पाटील फाउंडेशन, शहादा जि.नंदुरबार आयोजित स्वातंत्रसेनानी, सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच अण्णासाहेब पी.के.पाटील व्यापारी संकुल उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्यासह रावेर लोकसभा खासदार तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे यांच्यासह श्रीमती कमलाताई पाटील, आदिवासी मंत्री के.सी.पाडवी, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, माजी आमदार शिरिष चौधरी, नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content