वारसाहक्कासाठी महिला बालकल्याण विभागाकडून छळ : महिलेचा आरोप(व्हिडिओ)

पाचोरा, प्रतिनिधी  ।   कोरोनाने निधन झालेल्या पतीच्या वारस हक्कापासुन पत्नी व ३ वर्षाच्या मुलीला दुर ठेवुन त्यांचा महिला बाल कल्याण विभागाकडुन  मानसिक छळ होत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा येथील रहिवासी संदीप अशोकराव शिंदे यांचे दि. २४ मे २०२१ रोजी जळगाव येथील रुग्णालयात कोरोनाने निधन झाले आहे. मयत संदिप शिंदे हे नाशिक येथील खाजगी बियाणे कंपनीत मार्केटिंग सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी यांनी सदर मयताची पत्नी अश्विनी शिंदे व तिच्या तीन वर्षाच्या मुलीला वारसाहक्कापासून दुर ठेवले आहे. याप्रकरणी महिला बाल कल्याण विभागाने आर्थिक चिरीमिरी घेवून  आपली फसवणूक केल्याचा आरोप मयताची पत्नी अश्विनी शिंदे  यांनी केला आहे. तसेच ती दुसरे लग्न करेल, तिला वारसहक्क मिळु नये तसेच तीन वर्षाच्या मुलीच्या भविष्याचा कोणताही विचार न करता तिचा जबाब किंवा विचारपूस न करता लालसे पोटी अहवाल परस्पर सासरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार बनविण्यात आला असून मला माझ्या हक्कापासून महिला व बालविकास विभाग वंचित ठेवत असल्याचा आरोप अश्विनी शिंदे यांनी केला आहे.   विधवा महिला लग्न करणार की नाही, हे सासऱ्याच्या सांगण्यावरून जर अधिकारी किंवा कर्मचारी अहवालात सांगत असतील तर किती मोठा अन्याय या विभागामार्फत महिला व लहान मुलांच्या भविष्यावर सुरू आहे. याची कुजबुज जनसामान्यांमध्ये सुरू आहे. अश्विनी शिंदे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची कैफियत प्रसार माध्यमांशी बोलतांना मांडली. अश्विनी शिंदे या महिलेने न्याय मिळाला नाही तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा ही इशारा ही दिला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/390790832653382

 

Protected Content