Home Cities जळगाव रायपूर येथे शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन 

रायपूर येथे शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन 

0
103

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथे  अधिक मास आणि रामप्रभू व विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. समस्त रायपूर ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.  सहकार्याने

या कथा सोहळ्याचे प्रमुख प्रवचनकार म्हणून कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीप महाराज (वृंदावनधाम, जळगावकर) उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मधुर वाणीतील शिव महापुराण कथेमुळे भक्तांना अध्यात्मिक अनुभूती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत कथा होणार असून परिसरातील शिवभक्तांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी २५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य कलश व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक हनुमान टेकडी परिसरातून निघणार असून महिला भक्तांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांनी कळविले आहे. पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणाबाजी आणि भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा पार पडणार आहे.

या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे. वेशभूषा सादरीकरणासाठी आबा महाराज नेरे, बुलबुल वादक व गायक मुकेशजी महाराज (सांगवी), तबला वादक राधेश्याम महाराज (लालमाती) तसेच चौपदार जोतीलाल महाराज पाटे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमामुळे रायपूर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound