रोटरी क्लबच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलीसांना सॅनीटाझर व मास्कचे वाटप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्या वतीने महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना व्हिटामीनच्या गोळ्या, सॅनीटाझर, मास्क आणि कॅपचे वाटप आज सकाळी ११ वाजता गांधी मार्केट परिसरात करण्यात आले.

सविस्तर असे की,  कोरोनाच्या काळाच्या कठीण परिस्थितीला हाताळून आपली काळजी घेण्यासाठी स्वतःच्या परिवाराची व जीवाची पर्वा न करता तळपत्या उन्हात संपूर्ण पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन २४ तास दक्ष असून, प्रत्येक रस्त्यावर, गल्लीत, उभे राहून शक्य असलेली उपाय योजना करून उद्भवलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर रोटरी क्बलतर्फे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व महापालिका उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक असलेले सी-झेड व्हिटामिनच्या टॅबलेट, सैनीटायझर व मास्कचे ९०० किट बनवून महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि शहरातील सर्व पोलिस स्टेशन व पाळधी येथील पोलिस स्टेशनमधील संपूर्ण पोलिसांना वाटण्यात आले. यावेळी सगळ्यांनी क्लबचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष धनराज कासट , आयपीपी सागर मुंदडा, जीनल जैन, चंदन तोषणीवल हर्षल कटारिया, हितेश सुराणा, करण ललवाणी, रोहित आहुजा यांनी परिश्रम घेतले.

Protected Content