महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने नुकसान भरपाई जाहीर करावी – खासदार रक्षाताई खडसे

56702 rakshakhadse

नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी | अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेती उध्वस्त झाली आहे, तब्बल ९३ लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.महाराष्ट्रातील ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासंदर्भात लोकसभेत चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना योग्य मदत केंद्र सरकारने जाहीर करावी अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत बोलतांना केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये तर बागायती पिकांसाठी १८ हजार रुपये जाहीर केली आहे. ही मदत देतानांही अटीशर्ती टाकण्यात आल्या आहेत. केवळ दोन हेक्टरपर्यंतच्याच नुकसानीला मदत मिळणार आहे. ही मदत तुटपुंजी आहे.महाराष्ट्रातील पिकांचे झालेले नुकसानीची भरपाई केंद्र सरकरकडूनही मिळावी यासाठी लोकसभेत चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना योग्य मदत केंद्र सरकारने जाहीर करावी अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केली.

Protected Content