अवैध धंद्यांची माहिती द्या अन् मिळावा बक्षीस ! 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातली जी व्यक्ती अवैध धंद्याच्या क्लिप पाठवेल, त्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना एक हजार रुपये बक्षीस देण्याची त्यांनी केलेली घोषणेचा व्हिडिओ देखील सध्या जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे.

जिल्ह्यातील खामगाव मतदार संघात सह संतनगरी शेगावात मागील महिनाभरापासून अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप करीत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी पोलीस प्रशासनाला अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन देत सदर व्यवसाय बंद न झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या स्थापना दिनी डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

यामुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीस प्रशासनाने सानंदा यांना लेखी पत्राद्वारे आश्वासन देत मतदार संघात अवैध व्यवसाय चालणार नाही, या संदर्भात कडक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

 

 

 

Protected Content