यावल तालुक्यात भारत जोडो पदयात्रा जनजागृती चित्ररथाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्राच्या निमित्ता तालुक्यात काढण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाचे ठीकठीकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.

 

कॉंग्रेस पक्षाचे नेते व युवकांचे प्रेरणास्थान व खासदार राहुल गांधी हे सद्या देशाची एकता व अखन्डता कायम राहावी हा दृष्टीकोणतुन त्यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत भारत जोडो पदयात्रा निघाली आहे.                      ही यात्रा नांदेड मार्गाने महाराष्ट्र दाखल झाली असून दि. १८ रोजी बुलढाणा व अकोला जिल्ह्यात पहोचणार आहे. खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो पदयात्रेचे उद्देश्य व हेतु तसेच देशातील राजकारणारत गांधी घराण्याचे बलीदान व योगदाना संदर्भातील माहीती व जनजागृती करणारे चित्ररथ यावल तालुक्यातील सातोद कोळवद, डोंगर कठोरा , हंबर्डी , कळमोदा, बोरखेडा , चितोडा , सांगवी आणी यावल शहरासह विविध ठीकाणी फिरत आहे .                    या चित्ररथाच्या माध्यमातुन आमदार शिरीष चौधरी हे नागरीकांना , युवकांना भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करीत असुन , तालुक्यात या चित्ररथाला नागरीकांचा व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन, विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरीकांकडुन मिळणार प्रतिसाद हा लक्ष वेधणारा आहे. यावेळी तालुक्यात भारत जोडो पदयात्रेसाठी जनजागृतीसाठी फ़िरत असलेल्या या चित्ररथयात्रेत आमदार शिरीष चौधरी , कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे , जि पी पाटील सर , माजी गटनेते शेखर पाटील, यावल शहरातुन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले, शहराध्यक्ष अब्दुल करीम मनियार, माजी नगरसेवक गुलाम रसुल, मारूळ सरपंच असद जावेद अली , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे, राहुल गजरे , नईम शेख , धिरज कूरकुरे याशिवाय ठीकठीकाणचे सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येत या चित्ररथाच्या सोबत फिरत आहे.

 

Protected Content