पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना भाजपाच महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज भडगाव येथे सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचे उपनेता नितीन बानगुडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज तालुक्यातील शिवसेनेचे गटनेते नितीन बानगुडे यांचे तिन ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भडगावातील आझाद चौकात सायंकाळी 5 वाजता, पिंपळगाव बाजार चौकात सायंकाळी 6.30 वाजता आणि पाचोरा शहरातील मानसिंगका ग्राउंड येथे 8 वाजता आयोजन करण्यात आले आहे.