वाचनाच्या प्रेरणेतून मिसाईल मॅन यांना आदरांजली !

9b721290 8b0a 47b9 85f5 a0c44d0dd6fc

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.

 

गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी मिसाईल मॅन डॉ. कलामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. कलामांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांचे गटनिहाय वाचन घेण्यात आले. वाचलेल्या घटकावर काही प्रश्नांच्या माध्यमातून चर्चासत्र घेण्यात आले. शाळेतील शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी डॉ. कलामांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.

 

पृथ्वी , अग्नी , आकाश , नाग या भारतातील प्रचलित नावांचा वापर करून क्षेपणास्त्र तयार करून जगाला आपले सामर्थ्य व अवकाश क्षेत्रातील योगदान सिद्ध करण्यात डॉ. कलमांचा सिंहाचा वाटा आहे. वाचन करणं का गरजेचं आहे? याचे महत्व पटवून देण्यात आले. महापुरुषांना समजून घ्यायचे असेल तर आपण त्यांचे आत्मचरित्र व चरीत्र वाचले पाहिजे. ‘जब मैं भारत को सरलता की निगाहों से देखता हुं तब मुझे ना हिंदू ना की मुसलमान नजर आता हैं , बस हर इंसान में सिर्फ विवेकानंद और कलाम नजर आता हैं।’ अशा शब्दांत पाटील सरांनी कलामांची महती वर्णन केली. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या , शाखा व्यवस्थापक , शिक्षकवर्ग , विद्यार्थी – विद्यार्थीनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content