बारी समाज माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत (व्हिडिओ)

शिरसोली, प्रतिनिधी | ज्या गावात कोरोनाचे १० पेक्षा कमी रुग्ण आहेत तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आज शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक शाळा सुरु झाली असून विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आले.

 

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाच्या वतीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अल्प असल्याच लक्षात आल्यावर आणि त्याची तीव्रता कमी असल्याच लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने शहरी भागातील शाळा वगळता ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावात कोरोनाची रुग्ण संख्या दहा पेक्षा कमी आहे अशा गावातील शाळा या सुरू करण्यात आल्या आहेत. शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांचा हा उत्साह कायम टिकून ठेवण्यासाठी शाळा प्रशासनने ही विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सॅनीटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा पालन करून शाळा सुरू करण्यात आली. शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार असल्याने शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होतांना दिसून येत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/481467126886621

 

Protected Content