न्हावी शिवारातून ठिंबक नळ्यांची चोरी; यावल पोलीसात गुन्हा

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्‍यातील न्हावी शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने ४६ हजार रूपये किंमतीचे ठिंबक नळ्या मध्यरात्री चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मनोज अनिल बोरेले (वय-४१) रा. लक्कडपेठ फैजपूर ता. यावल यांचे फैजपूर शिवारात शेत गट नंबर २५२ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतात त्यांनी ठिंबक बसविलेल्या आहे. २२ जानेवारी रोजी सायंकाळी शेतातील कामे आटोपून ते घरी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील ४६ हजार रूपये किंमतीच्या ठिंबकच्या नळ्या चोरून नेल्या. हा प्रकार रविवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. मनोज बोरोले यांनी याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र महाजन करीत आहे.

Protected Content