अनाथ बालकांना विविध दाखले देण्याकरिता, जळगाव मध्ये समर्पित कक्ष स्थापन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अनाथ बालकांना विविध दाखले देण्याकरीता राज्यासह जळगाव जिल्हयात २३ फेब्रुवारी, २०२४ ते ५ मार्च, २०२४ या कालावधीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमातर्गंत अनाथ बालकांना आधाकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, महाराट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड आदी कागदपत्रे काढुन देण्यासाठी समर्पित कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यासाठी पंधरवडा मोहिम राबविण्यात येणार आहे.

राज्यात अनाथ बालकांच्या विविध समस्या बधयला मिळतात, अनाथ बालकांना विविध दाखले काढण्याकरीता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी सुचना चर्चेदरम्यान विधनसभेत अनाथ बालकांच्या विविध मागण्या संबधित बैठक घेण्यासंदर्भत आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आमदार बच्चु कडु यांच्या समावेत ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये २३ फेब्रुवारी, २०२४ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत अनाथ बालकांना आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, महारार्ष्ट राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड आदी कागदपत्रे त्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवाडा राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुषगाने जिल्हास्तरावर महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातुन जिल्हयातील सर्व तालुका स्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे १५ दिवसाकरीता समर्पित कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content