टाकरखेडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत आज दिनांक २८/२/२०२४ रोजी मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व १८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे तसेच खावू म्हणून केळी, चॉकलेट वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक पी.टी.पाटील तसेच त्यांच्या पत्नी सौ. मिराबाई पाटील आणि शाळेतील सर्व शिक्षक यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खावू वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य वाटपाच्या पी.टी.पाटील यांनी सांगितले की, शाळा हे माझे मंदिर आहे, शाळेतील विद्यार्थी हेच माझे दैवत आहे आणि मी त्यांचा पुजारी आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाखमोलाचा आहे तो आनंद टिकवून ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. कुठेतरी आपण समाजाचे देणे लागतो त्या भावनेतून मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य , खावू वाटप करण्यामागचा उद्देश आहे. यावेळी उपशिक्षक जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, नाना धनगर, रामेश्वर आहेर, श्रीमती निर्मला महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शेळके यांनी केले व आभार मानले.सदर कार्यक्रमास पालक डोंगरे, स्वयंपाकी व मदतनीस श्रीमती आशा कोळी, श्रीमती लता तायडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content