कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

 

जळगाव : प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र   विद्यापीठातील परीक्षा विभागातील भ्रष्टाचाराच्या  चौकशीची मागणी  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे  माजी महापौर व  सिनेट सदस्य, माजी  व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णु भंगाळे यांनी केली आहे  

 विष्णू भंगाळे यांनी  प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात  चार वर्षापासून परीक्षा विभागात मोठ्या प्रमाणावर  आर्थिक गैरव्यवहार  सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळे खालील मुद्द्यांबाबत सखोल चौकशी व्हावी 

परीक्षा विभागामध्ये गोपनीय कामाच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे एकाच पार्टीला चार वर्षापासून गोपनीय कामे दिली जात आहेत त्यामध्ये वेगवेगळे अर्थ शीर्षक तयार करून मोठ्या प्रमाणावर दर आकारून आर्थिक गैरव्यवहार होत आहे कोणत्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न राबवता करोडो रुपयांची बिले मंजूर करून संबंधित पार्टीला तत्काळ पेमेंट केले जात आहे.

 

.विद्यापीठांमध्ये फक्त  प्रश्नपत्रिका  गोपनीय आहे मात्र इतर कामेदेखील जसे उत्तर पत्रिका छपाई, विविध प्रकारची सर्टिफिकेट्स, रिझल्ट लागल्यानंतरचे लेजर्स बाइंडिंगसह, कॉलेजेसला पाठवण्यात आलेली पत्रे इत्यादी कामे गोपनीयतेच्या नावाखाली जास्तीच्या दराने केले जात आहेत त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करून विद्यापीठाचे नुकसान होत आहे.

 

परीक्षा विभागाकडे परीक्षा झाल्यानंतर पार्टीचे बिल विद्यापीठात आल्यानंतर ते जसेच्या तसे मंजूर करून वित्त विभागाकडे पाठवले जाते त्यामध्ये सखोल तपासणी होत नाही,  चुकीच्या पद्धतीने झालेल्या कराराचा  आधार घेऊन बिले मंजूर करण्यासाठी वित्त विभागाकडे आग्रह धरला जातो.

 

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचे  बील रुपये पाच कोटी पेक्षा जास्त  झाल्याची चर्चा आहे  त्यामध्ये वित्त विभागाने तत्कालीन कुलगुरूंच्या निदर्शनात आणुन दिले व  त्यानुसार कुलगुरूंनी संबंधित  पार्टीला विद्यापीठात बोलवुन बिल  कमी करण्याविषयी सुचित केले होते त्यानुसार पार्टीने बिला मध्ये चक्क  75 लाखाची सूट दिली यावरून असे दिसून येते की बिलामध्ये किती मोठ्या प्रमाणात आर्थिक  गैरव्यवहार सुरु आहे त्याचे हे बोलके उदाहरण आहे. अशा गैरव्यवहारास विशेष कार्यकारी अधिकारी, परीक्षा संचालक व  निर्णय प्रक्रियेतील  वऱीष्ठ अधिकारी  व पदाधिकारी हे सर्वस्वी जबाबदार आहेत.

 

सध्या विद्यापीठात प्रभारी राज सुरू आहे तरीदेखील सध्याचे प्रभारी कुलगुरू प्रा वायुनंदन  नाशिकहुन कामकाज पाहत असल्यामुळे  कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता त्यांच्याकडे पाठवलेल्या सध्याच्या बिलांवर सही करून पाठविल्याचे सांगितले जात आहे सध्याची  बिलदेखील मागील बिलाप्रमाणे अवास्तव  असू  शकतात  म्हणून हे  बिलदेखील तपासणी शिवाय अदा करण्यात येऊ नये.  विद्यापीठाचे होणारे आर्थिक नुकसान थांबेल. सध्याच्या कोविड१९ च्या महामारीच्या परिस्थितीत  या बिलातदेखील सुमारे  एक कोटीची सुट मिळावी अशी आग्रहाची मागणी मी विद्यापीठाचा  सिनेट मेंबर म्हणुन  करत आहे.

मागील बिलात दिलेली 75 लाखाची घसघसित  सूट  विचारात घेता आत्ताचे आलेले बिल देखील काटेकोरपणे तपासणी केल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये.

 

तसे न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी परीक्षा संचालक, प्रभारी प्र-कुलगुरू व प्रभारी कुलगुरु ,पदाधिकारी यांची राहिल याची नोंद घ्यावी.

 

 

Online परीक्षेसाठी Offline प्रक्रियेपेक्षा कमी खर्च व्हायला हवा होता .परंतु Online प्रक्रियेसाठी खर्च जास्तच वाटतो आहे अशीही चर्चा सध्या या क्षेत्रातील जाणकारांमध्ये आहे

 

विष्णू भंगाळे यांनी या निवेदनाच्या प्रति उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  उदय  सामंत  ,  जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव  पाटील  आणि  प्रभारी कुलगुरु यांना पाठविलेल्या आहेत

 

Protected Content