फत्तेपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मान्सूनपुर्व आढावा बैठक

aarogya baithak

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर येथे मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच साथीच्या रोगाची व किटकजन्य आजारांची लागण होऊ नये, म्हणून उपाय योजना बाबत एकूण २२ गावांना व १४ ग्रामपंचायतीना लेखी माहिती देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, दोन आरोग्य सेवक, परिचर, ड्राइवर यांचा सहभाग असलेल्या साथरोग पथकाची स्थापना करण्याचे आदेश प्रा.आ.केंद्र फत्तेपुरसह तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्राना देण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष काळजी घेऊन, मुख्यालयात उपस्थित राहण्यासाठी सक्त सूचना देण्यात असून, कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच आढावा सभेत प्रा.आ. केंद्र फत्तेपुरचे कामकाज अतिशय उत्कृष्ट असून, सन २०१८-१९ मध्ये एकूण १८४ प्रस्तूती तसेच कुटुंब कल्याण नियोजनांच्या २८३ शस्त्र क्रिया करण्यात आल्या, पैकी दोन अपत्यावर १७७ कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ९३१ गरोदर माता व ८३८ मध्ये ० ते ६ महिन्याच्या बालकाच्या ४ तपासण्या पूर्ण करण्यात आला. गोवर रुबला मोहिमेअंतर्गत १४०८८ बालकांना नियोजनबद्ध पद्धतीने इंजेकॅशनद्वारे गोवर रुबेला लस देण्यात आली. २८० मातांना प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा पहिला, दुसरा, तिसरा हफ्ता देण्यात आला. २९३ मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला. माता बाल संगोपनाचे कामकाज मागील वर्षाप्रमाणे करून १००% गरोदर माता व बालकांना आरोग्य सुविधा देण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.आ.केंद्र फत्तेपुर येते सर्वाधिक प्रस्तूती केलेल्या कलिंदा सानप, वैशाली खंदारे, सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या प्रतिभा वानखेडे, वैशाली खंडारे व आर.सी.एच.नोंदणी मध्ये सुरेखा गोसावी, कविता वाहुले, के.एस.सानप. यांचा सत्कार करण्यात आला.तसेच याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक जाधव, डॉ.श्यामल इंगळे, प्रा. आ. केंद्राचे सर्व कर्मचारी व जेष्ठ पत्रकार सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत वानखेडे यांनी केले तर आभार पी.के. वाणी यांनी मानले.
याचप्रमाणे पुढील पंधरवाड्यात तालुक्यातील प्रत्येक प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र येथे भेट देऊन मान्सूनपूर्व आढावा घेण्यात येणार असून या अनधिकृत गैरहजर आढळून आल्यास कठोर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.

Protected Content