एरंडोल येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी व थॅलेसिमिया जनजागृती शिबिर

एरंडोल प्रतिनिधी । येथील सुखकर्ता फाउंडेशन आणि केशवस्मृती संस्था व सेवा समूह जळगाव यांच्यातर्फे (दि.१७) रोजी एरंडोल येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात आयोजित मोफत हिमोग्लोबिन तपासणी व थॅलेसिमिया जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जळगाव येथील केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या थॅलेसिमिया मुक्त मिशन च्या प्रकल्प प्रमुख डॉ. सई नेमाडे ( एम. डी. शरीरविकृतीशास्त्र )व प्रकल्प समनव्यक भानुदास येवलेकर यांच्या टीम ने १२० नागरिकांचे एच.बी . इलेक्ट्रोफेरेसिस या रक्तचाचणीसाठी सँपल घेतले.

विशेष म्हणजे लहान बालकांपासून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, किशोरवयीन युवती व युवक यांनी उत्साहाने हि चाचणी करून घेतली. याप्रसंगी सद्यस्थितीत थॅलेसिमिया या रक्त विकाराचे ५ लाख रुग्ण भारतात आहेत व ५ कोटी नागरिक हे थॅलेसिमियाचे वाहक आहेत अर्थात त्यांना कुठलाही त्रास होत नसल्यामुळे हि चाचणी केल्यानंतरच त्यांच्या पुढील पिढीमध्ये येऊ शकणारा हा अनुवांशिक असा रक्तविकार आपण रोखु शकतो म्हणून याबाबत जागरूकता आणणे महत्वाचे आहे व त्यासाठी असे शिबीर आयोजित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ . सई नेमाडे यांनी केले तर सुखकर्ता फाउंडेशनच्या अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्षा डॉ. गीतांजली ठाकूर यांनी युवक युवतींनी विवाहपूर्व ग्रह तारे, मंगळ कुंडलीच्या अभ्यासाऐवजी आरोग्यकुंडलीचा आग्रह धरला पाहिजे व त्यासाठी ग्रामीण भागात याविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे सुखकर्ता फाउंडेशन तर्फे हे शिबीर आयोजित केल्याचे मत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील किशोरवयीन युवती व महिला यांच्या मध्ये रक्तक्षयाचे प्रमाण हि मोठया प्रमाणात असल्यामुळे या वर्गासाठी थॅलेसिमिया या आजाराबरोबरच रक्तक्षयाचे निदान या चाचणीच्या माध्यमातून होत असल्यामुळे समाधान व्यक्त केले.या थॅलेसिमिया रक्तचाचणी शिबीर आयोजनाकामी दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी युवराज पाटील, विक्रम चौधरी, राजू चोधरी, नाना महाजन, माउली क्लासेस चे गोरख महाजन, युवा कार्यकर्ते प्रवीण चौधरी, सागर चौधरी, राहुल चौधरी, नितीन पाटील, पवन चौधरी, रोहित मराठे, विक्की मराठे, कैलास चौधरी, अजय मराठे, बाळा धनगर, गोरख चौधरी आदी व सुखकर्ता फाउंडेशन चे शेखर बुंदेले , सागर ठाकूर यांनी परिश्रम घेतले. नगरसेवक डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Protected Content