अमळनेरात पाण्याचा निचरा व नाल्याचे विस्तारीकरण करा : नागरिकांची मागणी

अमळनेर, प्रतिनिधी | येथील भालेराव नगर, गुरुकृपा कॉलनी, आर. के. नगर, सुनंदा पार्कमध्ये पावसाचे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनला असून पाण्याचा निचरा व नाल्याचे विस्तारीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील रहिवाश्यांनी नगरपरिषदेच्या  मुख्याधिकाऱ्यांंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, भालेराव नगर, गुरुकृपा कॉलनी आर. के. नगर, सुनंदा पार्क मध्ये नेहमीच पावसाचे पाणी तुंबते. कॉलनी विकासकांनी मुळ नाल्याची लहान गटार केलेली आहे व तिची मुळची दिशा बदलवली गेलेली आहे.तसेच त्या गटारीत ७५ टक्के गाळ साचलेला आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी कुठल्याही दिशेने वाहते. कॉलीनीतील रस्त्यावर पाण्याचा लोंढा वाहत असतो. पुढे गुरुकृपा कॉलनीतील काही लोकांनी सिमेंट पाईप टाकलेले आहेत. त्यामुळे कॉलनीपरीसरातील पाणी मुळ नाल्यात (पिंपळे) जाण्यास अडथळा निर्माण झालेला आहे. हया कारणांमुळे पाणी नाल्यात न जाता विरुध्द दिशेने भालेराव नगर परिसर कॉलनीमध्येच साचत आहे. हया सर्व कारणांमुळे आमची कॉलनी म्हणजे एक बेटच वाटायला लागले असून आमच्या कॉलनीतील सर्व लोकांना धुळे रस्त्यावर ये जा करणेसाठी सुनंदा पार्क हा एकच रस्ता आहे. परंतु, तिथेच पाणी साचल्यामुळे कामावर जाणेसाठी तसेच मुलांना शाळेत जाणेसही कठीण होऊन गेलेले आहे. आमच्या कॉलनी भागातले नगरसेवकी या कामात कोणतेही लक्ष देण्यास तयार नाहीत. तरी शेतामधुन येणाऱ्या तसेच आर. के. नगर परीसरातून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याता यावा तसेच नाल्याचे विस्तारीकरण करावे व नेहमीच उदभवणाऱ्या या समस्यांबर तोडगा काढावा मागणी लक्ष्मण नत्थू पाटील व रहिवाश्यांनी केली आहे.

Protected Content