सावखेडा शिवारात कबुतरांच्या अचानक मृत्यूने खळबळ ( व्हीडीओ )

जळगाव, प्रतिनिधी । शहरालगत असणाऱ्या सावखेडा शिवरातील एका शेतात अनेक कबूतर मृत्यूमुखी पडल्याचे शेतकऱ्यांना आढळून आल्याने खळबळ उडाली   आहे. 

सावखेडा शिवारातील मातोश्री वृद्धाश्रमाजवळील निलेश नामदेव जाधव यांच्या शेतात जवळपास २० कबुतर मृत अवस्थेत  पडल्याचे आढळून आले आहे. शेतात कोणत्याही प्रकारचे पिक नसून त्यात मशागतीचे काम सुरु आहे शेतात कोणतीच उभी पिके सध्या नसल्याने  कोणत्याही प्रकारचे औषध फवारणी करण्याचा प्रश्नच  नाही. त्यामुळे हे पक्षी अचानक का मारून पडले असावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

हे कबुतर उन्हात तसेच सावलीतदेखील मृत आवस्थेत आढळून आले  आहेत. याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य जगदीश बैरागी यांना  भ्रमणध्वनीद्वारी सूचित करण्यात आले असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पशु वैद्यकीय अधिकारी संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधून कळविले. संजय गायकवाड यांनी प्यायला पाणी न मिळाल्याने उष्माघाताने पक्षांचा मृत्यू झालाअसावा असा अंदाज व्यक्त केला . या परिसरात उद्यापासून पक्ष्यांसाठी  पाण्याची व्यवस्था करावी असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले. संस्थेचे सदस्य राजेश सोनवणे, जगदिश बैरागी व शेतकरी बांधव उद्यापासून शिवारातील पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणार आहेत , असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले .

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/263509098794779

 

Protected Content