कचरा कंत्राटदाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

यावल प्रतिनिधी । स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील ओला व सुका कचरा गोळा करणाऱ्‍या कंत्राटदाराच्या व्यवस्थापनाची व पालिका प्रशासनाला घनकचरा प्रकल्पातून किती महसूल मिळाला याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्ष प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  

या संदर्भात शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगर परिषदच्या वतीने शहरातील ओला कचरा व सुका कचरा संकलनाच्या माध्यमातुन आजपर्यंत ठेकेदाराच्या वतीने किती टन ओला आणि सुका कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. तसेच या घनकचऱ्याच्या माध्यमातुन अनेक ठिकाणी ठेकेदाराकडुन कचऱ्याच्या नावाखाली माती उचलण्यात येवुन त्याचे वजन वाढवण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्याचप्रमाणे या घनकचरा संकलनातुन प्रशासना किती उत्पन्न मिळालीत, आजपर्यंत यावल शहरातुन संकलीत करण्यात आलेल्या घनकचऱ्यातुन किती कंपोष्ट खत निमती करण्यात आली असुन प्रशासनास किती फायदा झाला आहे . ठेकेदाराच्या वतीने कोणत्या ठीकाणी या घनकचऱ्याचे संकलन व विक्री करण्यात येत आहे. याबाबतच्या सर्व विषयांची मुख्याधिकारी यांनी तात्काळ सखोल चौकशी करावी व या सर्व कारभारात अनियमता आढल्यास संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणी चौकशी पुर्ण होई पर्यंत संबंधीत ठेकेदारास देय रक्कम अदा करण्यात येवु नये , अर्थात त्याची बिले काढण्यात येवु नये अशी मागणी केली आहे.

या तक्रार निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , युवा सेनेचे शहरप्रमुख सागर देवांग, आदीवासी सेनेचे यावल तालुका संघटक हुसैन तडवी , विजय पंडीत , पिंटु कुंभार , सुरेश कुंभार , योगेश राजपुत यांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content