पारोळा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा – शेतकरी संघटनेची मागणी

पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्या करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे पारोळा तहसीलदार, कृषी अधिकारी, पिक विमा प्रतिनिधी जळगाव, व ना.कृषी मंत्री दादा भुसे, ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि एरंडोल प्रांताधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

यावर्षी खरीप हंगामाला जणू काय ग्रहणच लागले होते, सुरुवातीला अल्प वृष्टी, मध्ये पावसाचा पंधरा पंधरा दिवसाचा खंड परत वरून राजा मुसळधार पावसाची सुरुवात, सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला कापूस लागवड झाली पेरणी झाली शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या परंतु पावसाने हुलकावणी देणे काही थांबवले नाही जवळपास 15 ऑगस्ट पर्यंत अनियमितपणे खंड पडला परिणामी पिकांची वाढ खुंटली जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये घट होईल असे चित्र दिसत होते जेमतेम या कोरड्या दुष्काळाच्या  खाईतून शेतकरी बाहेर निघाले परंतु 15 ऑगस्ट पासून ते आज पर्यंत सलग दररोज पावसामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही असा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीवर जगणार्‍या अन्नदात्या चे तोंडचे पाणी पळाले.एक महिन्यापासून पडणाऱ्या धो धो सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाईट अवस्था झाली परिणामी कापूस लाल पडला व लाल्या व द ह्या रोगाचा प्रादुर्भाव शेतावर दिसू लागल्याने शेतांमध्ये पाणी तुंबल्याने झाडे कोमजुन कैऱ्या सडत आहेत, कापसाच्या बोंड  मधून उग्र स्वरूपाचा दुर्गंधी येत आहे,.  ज्या आशेवर शेतकऱ्याने भविष्याचे स्वप्न पाहिले तेच स्वप्न डोळ्यांसमोर चकनाचूर होताना दिसत आहे आता जगावे की मरावे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जे घरात होते ते सगळं शेतात टाकून शेती व्यवसायावर जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी निराशा आली तरी सरकार व शासनाने व पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाला हात घालून दिलासा द्यावा व सरसकट नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे मे अखेर व जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पूर्वहंगामी कपाशी लावण्यात सुरुवात होते सप्टेंबर महिन्यात कपाशीचे बोंडे पक्व होऊन वेचणी करण्यास शेतकरी सुरुवात करतो मात्र तालुक्यात संततधार पावसाने पक्व झालेल्या बोंडातून झाडावरच कोंब फुटू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यातून शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला आहे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उडीद मूग मका सोयाबीन कापूस वाया गेले कपाशी ही गेली यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने साथ दिली नाही नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत शेतकऱ्यांच्या विहिरी ओ सांडू लागलेल्या आहेत विहिरींचे पाणी व शेत जमीन सारखी झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ते पाणी शेतांमधुन पांझरताना दिसत असल्याने परिणामी पिके पिवळी पडून नष्ट होत आहेत बळीराजा ची हिम्मत खचली आहे व अन्नदात्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे.

शेती शेतकरी संलग्न मागण्या पूर्ण न केल्यास शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून प्रसंगी आमरण उपोषण करणार आहे.

यावेळी, निवेदन देताना नायब तहसीलदार शिंदे, वारकर साहेब, कृषी विभागातर्फे, साळी मॅडम, शितल पाटील, बी.के बोरसे, बी.आर. पाटील, तसेच पिक विमा प्रतिनिधी, सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष भिकनराव पाटील, नरेश चौधरी, छावाचे तालुका शेतकरी आघाडीचे, अविनाश मराठे प्रकाश पाटील, संजय पाटील, अजित पाटील, अधिकार पाटील, प्रकाश पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, निलेश चौधरी, रघुनाथ पाटील, राजेंद्र पाटील, स्वाभिमानीचे वाल्मीक पाटील तालुक्यातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!