चाळीसगाव येथे ‘शिवसह्याद्री’ महानाट्यातील प्रमुख आभिनेत्यांची भेट

WhatsApp Image 2019 08 11 at 1.21.38 PM

चाळीसगाव प्रतिनिधी । युवानेते मंगेश चव्हाण मित्रपरिवार व चाळीसगावातील समस्त सामाजिक संस्था यांच्यामार्फत चाळीसगाव शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या शिवसह्याद्री या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या महानाट्यामध्ये सहभागी असलेल्या कलाकारांच्या भेटीसाठी शंभूराजे आणि शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेले अभिनेते कलाकार यांनी आज भेट दिली. यावेळी शहरातील कलाकार यांची तालीम बघून त्यांनी कौतुक केले.

कलाकार मान्यवरांचा सत्कार
महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक अँड. विनय दाभडे यांचे वडील चंद्रकांत दाभाडे व मोठे भाऊ आनंद दाभाडे यांनी शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेले अभिनेते विशाल राऊत व संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेले विशाल बोडके तसेच त्यांच्या सोबत असलेले संतोष गराडे निलेश जगदाळे गौरव गुंड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

येत्या 17 व 18 ऑगस्ट रोजी शिवसह्याद्री महानाट्याचे भव्य असे प्रयोग चाळीसगाव शहरातील सिताराम पैलवान यांच्या मैदानावर होणार असून चाळीसगाव तालुक्यातील स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळत आहे. इच्छुक हौशी कलावंतांचे दिनांक 1 ऑगस्‍ट पासून दररोज दोन सत्रात रंगीत तालीम येथील पाटीदार भवन कार्यालयात मोठ्या उत्साहात सुरू आहे. युवानेते मंगेश दादा चव्हाण मित्रपरिवारआयोजित या महानाट्यात शहरासह तालुक्यातील महाविद्यालयीन व शाळकरी तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे.

पहिल्या दिवसांपासून या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक अँड. विनय दाभाडे हे विद्यार्थ्यांकडून उत्तम रित्या प्रात्यक्षिके करून घेत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रात्यक्षिकाला सहभागी असलेल्या कलाकारांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे

हा महानाट्याच्या यशस्वीततेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे, विजय निरखे, प्रदीप पुराणिक, भूषण पाटील, संग्राम पाटील, भास्कर पाटील, चेतन चव्हाण, सिद्धांत पाटील, रोहित कोतकर प्रणव वाघ, मनोहर गवळी आदी परिश्रम घेत आहे.

Protected Content