तीन वर्षेच राजकारणात…अध्यक्षपदावरून निवृत्त होणार ! : शरद पवारांची मोठी घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या लोक माझा सांगाती पुस्तकाच्या दुसर्‍या खंडात खळबळजनक दावे करतांनाच अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. यात त्यांनी तीन वर्षात निवृत्त होणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसर्‍या खंडाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. यात अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेतील फुटीवर त्यांनी सविस्तर लिहले आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे आपण तीन वर्षेच राजकारणात राहणार असून नंतर अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

या संदर्भात त्यांनी नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात पहिल्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल याचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रेक शमावयला शिवसेना नेतृत्व कमी पडले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधताना कधी जाणवली नाही. उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी या पुस्तकात केला आहे. २०१४ नंतर शिवसेना आणि भाजपमधील संवाद कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी आपल्या या पुस्तकामध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेचा शपथविधी समजल्यावर धक्का बसला होता असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. या शपथविधीवरून गेल्या काही दिवसांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात आल्यामुळे पवार यांच्या या भाष्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Protected Content