आज केवळ जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा : खडसे

khadse e1550572684596

जळगाव (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाराजीबाबत काही चर्चा झाली नाही, आज केवळ जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या नाराजीबाबतचे गूढ कायम ठेवले आहेत.

 

भाजपमधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन या तिघांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी नाराजीबाबत काही चर्चा झाली नाही, आज केवळ जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याची प्रतिक्रिया माध्यमाना दिली.

Protected Content