रिक्षातील तिघांनी प्रवाशाला लुटले; रिक्षाचालकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याला तिघांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून रिक्षाचालकाला रिक्षासह रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अभीजीत राजू मराठे (रा.पिंपळकोठा,ता. एरंडोल) हे ३० रोजी सायंकाळी यांना तिघांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (२८,रा.फातेमा नगर) याला रविवारी रामानंद नगर पोलिसांनी रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८०० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. 

अभीजीत मराठे हे ३० रोजी सायंकाळी इच्छा देवी चौकातून पिंपळकोठा जाण्यासाठी रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.५८४१) बसले. मागे बसलेल्या तिघांनी काही अंतरावर मराठे यांच्या खिशातून २४०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यावर उतरवून पळून गेले होते. या घटनेनंतर मराठे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना हकीकत सांगितली. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, विजय खैरे, शिवाजी धुमाळ, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी, उमेश पवार, हरीष डोईफोळे, संतोष गीते व सागर देवरे यांच्या प‌थकाने रिक्षा चालक रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (२८,रा.फातेमा नगर) याचा शोध घेवून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातील रिक्षा ताब्यात घेतली आहे. इतर संशयित दोन जण फरार आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content