एलसीबी पथकाकडून दुचाकी चोरी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश (व्हिडीओ)

शेअर करा !

LCB news

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात दुचाकी चोरीचे मोठे रॉकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शनिवारी पकडले. यात सतरा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून 6 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

store advt

दुचाकी चोरी गुन्ह्यातील यांना अटक
दीपक गोपाळ कोळी (वय.२२, रा.डांभूर्णी, ता.यावल), अजय ईश्वर कोळी (वय २१, रा.दहिगाव संत, ता.पाचोरा), प्रवीण भाईदास कोळी (वय २०, रा.विखरण, ता.एरंडोल), संदिप राजु कोळी (वय १९), रमजानशहा शकुरशहा (वय १९), प्रशांत उर्फ गोलू निंबा कोळी (वय २०, तीघे रा.कुरंगी, ता.पाचोरा) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
पो.नि.बापू रोहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, कमलाकर बागुल, सुरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, परेश महाजन, इंद्रीस पठाण, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने या सर्व सहा संशयितांना दोन दिवसात ताब्यात घेतले. चौकशी केली असता एकुण १७ दुचाकी चोरींची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार सर्व दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या दुचाकींची किंमत ५ लाख ८० हजार रुपये आहे.

दीपक कोळी हा या टोळीचा मोऱ्हक्या आहे. तो वर्षभरापासून दुचाकी चोरी करीत आहेत. त्याने चार-पाच दुचाकी अत्यंत कमी किमतीत विकल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुरज पाटील यांना दोन महिन्यांपूर्वी मिळाली होती. परंतू, त्यावेळी दीपककडे दुचाकी नव्हती. अशात सुरज पाटील यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने आणखी काही कर्मचारी सोबत घेऊन दीपकवर नजर ठेवली. दोन दिवसांपूर्वी त्याच्याकडे एक नवी दुचाकी आढळुन आली. याचवेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशीला सुरूवात केली. दीपकला खाक्या दाखवताच त्याने आणखी साथीदारांची नावे सांगीतले.

दीपक कोळी हा प्रमुख संशयित आहे. सर्वप्रथम त्याने पाच दुचाकी चोरी करुन विकल्या. यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर पाचही संशयितांचा सहभाग आला. ही टोळी केवळ नव्या-कोऱ्या दुचाकी चोरी करीत असे. यानंतर ग्रामीण, आदीवासी भागात दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधायचे. गरज असल्यामुळे तात्काळ नवी दुचाकी विकायची आहे, कागदपत्र नंतर आणून देतो. असे सांगून ते ग्राहकांना भुरळ घालयाचे. नवीन दुचाकी अगदी कमी किमतीत मिळत असल्यामुळे त्यांना सहजपणे ग्राहक मिळत होते. एकदा दुचाकी विकुन पैसे घेतले की हे चोरटे परत ग्राहकाला संपर्क करीत नसे. किंवा ग्राहकाने केलेल्या फोन कॉलला देखील उत्तर देत नव्हते. त्यामुळे ग्रहकाला दुचाकीचे कागदपत्र मिळत नव्हते. पहुर, जामनेर, पिंपळगा हरे, धरणगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा या ठीकाणांहुन त्यांनी दुचाकी चोरले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!