Home Cities धरणगाव पिंप्री येथील दुकानातून ६१ हजाराची रोकड लांबविली; एकावर गुन्हा दाखल

पिंप्री येथील दुकानातून ६१ हजाराची रोकड लांबविली; एकावर गुन्हा दाखल

0
128

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री येथील किसान सेवा केंद्रातून एकाने ६१ हजार ४८८ रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चंद्रकांत फुलचंद चौधरी (वय-५५) रा. पिंप्री ता. धरणगाव हे मेडीकल चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्याच्या मालकीचे सोनवद रोडवरील श्री सिध्दीविनायक किसान सेवा केंद्र दुकानावर असतांना त्यांच्या जवळील ६१ हजार ४८८ रूपयांची रोकड गावातील कृष्णा नामदेव ठाकूर रा. बाबाजी चौक चाळीसगाव ह.मु. पिंप्री ता. धरणगाव याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चंद्रकांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कृष्णा ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी करीत आहे.


Protected Content

Play sound