भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण वाढले, एकूण आकडा ११४

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेनही वेगाने वाढत आहे. भारतात ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता ११४ वर पोहोचली आहे.

तात्काळ हा संसर्ग फैलावापासून रोखणं महत्त्वाचं असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. त्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रत्येक राज्याला देण्यात आल्या आहेत.

सध्या ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

एकीकडे देशात कोरोनाचा फैलाव वाढत आहेत तर दुसरीकडे या जीवघेण्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात जैय्यत तयारी करण्यात आली आहे. कोव्हिड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये करण्यात आला

राज्यात सुरवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी ७ हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तिसऱ्या टप्प्यात मुंबईत ६३ लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे ५० हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे

Protected Content