भीमा कोरेगाव हिंसाचार : नवलखा, तेलतुंबडे यांना १६ मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना १६ मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना अंतरिम दिलासा दिला आहे. अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. गौतम नवलखा व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान, १६ मार्चला पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पार पडणार आहे.

Protected Content