जळगावात वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या वयोवृध्द महिलेच्या गळ्यातून तीन तोळ्याची सोन्याची पोत लंपास झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवार रोजी पिंप्राळा येथे आठवडे बाजार असतो. उषाबाई आनंदा सनान्से (वय-65) रा. ढाके नगर, भिकमचंद जैन नगर जवळ ह्या बुधवारी 13 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बाजारात गेल्या. बाजारातील सोमाणी मार्केट, शिवा हाईट समोरून भाजीपाला घेवून घरी परतत असतांना 6.30 वाजेच्या सुमारास गळ्यात असलेली 45 हजार रूपये किंमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार त्यांना लक्षात आल्यानंतर उमेश सनान्से याला सांगितले. त्याने बाजारात जावून शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी उषाबाई सनान्से यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content