शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण !

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला.

 

 

सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात निघालेले असतांना आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वैभव नाईक यांनी लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच नाशिकमधील शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.

Protected Content