भाजपा मुख्यालयास दोन एकर जमीन देण्यासाठी दिल्लीच्या मास्टरप्लॅनमध्ये केंद्राकडून बदल

bjp office pti

नई दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाला दिल्लीमधील दिन दयाळ उपाध्याय मार्गावर राष्ट्रीय कार्यालयासाठी अतिरिक्त दोन एकर जमीन मिळाली आहे. केंद्रीय आवास आणि शहरी मंत्रालयाने यासाठी नियमांमध्ये बदल केले असून भूमी उपयोजन अर्थात ‘लॅड-युज’ परिवर्तनाची अधिसूचना काढली आहे. डीडीयू मार्गावरील भाजपच्या तीन मजली मुख्यालयाचे उद्घाटन फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले होते. तर अशोक रोडवरील एका बंगल्यात भाजपचे जुने कार्यालय होते.

 

‘द हिंदू’ ने या संदर्भात विशेष वृत्त प्रकाशित केले आहे. या रिपोर्टनुसार दिल्लीच्या मास्टरप्लाननुसार २०२१ मध्ये भाजपला दिलेल्या भूखंडाला निवासी वापरासाठी आरक्षित केलेली होती. परंतू आता या आरक्षणात बदल करत भूखंडाला सार्वजनिक आणि अर्ध सार्वजनिक श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.

 

विद्यमान भाजप कार्यालय ६-ए, डीडीयू मार्गावर आहे. बुधवारी भूमी-उपयोग परिवर्तनासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार भाजपला देण्यात येणारी ८,८६० वर्ग मीटर अर्थात २.१८९ एकर जमिनीचा अतिरिक्त तुकडा ३ बी,डीडीयू मार्गावर आहे. केंद्र सरकारने झोन-डी के डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार दिल्ली विकास प्राधिकरणने ९ मार्चला एक नोटीस प्रसिद्ध कर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या.

 

या अधिसूचनेत सांगण्यात आले होते की, नोटीस प्रसिद्ध केल्याच्या ३० दिवसाच्या आत कुणाचीही हरकत किंवा सूचना प्राप्त झालेली नाहीय. केंद्र सरकारने सर्व बाबींवर विचार करून ‘मास्टरप्लॅन आणि झोनल डेवलपमेंट प्लॅन’मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेजारच्यांसाठी भूखंडाच्या उत्तर दिशेला प्राथमिक शाळा, दक्षिण दिशेला डीडीयू मार्ग, पूर्व दिशेला प्रस्तावित २० मीटरचा रस्ता आणि समूह आवास प्रकल्प. तर पश्चिम दिशेला २० मीटरचा रस्ता आहे.

Protected Content