हिवाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु

The winter session will begin tomorrow

 

नागपूर वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्य विधामंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (दि.16) नागपूर येथे सुरु होत आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांनी घोषणा केली असून होणाऱ्या अधिवेशनात भाजप पक्ष कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या अधिवेशनात अवकाळी पाऊस, पूर्वीच्या सरकारच्या विविध प्रकल्पांना देण्यात आलेली स्थगिती, राज्याची आर्थिक स्थिती या मुद्द्यांसह अन्य गोष्टींवर सुद्धा अधिवेशनात चर्चा होणार आहे. तर गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे हे विरोधी पक्षनेते म्हणून पहिले अधिवेशन असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. पण नव्या सरकारपुढे काही आव्हाने सुद्धा विरोधी पक्षाकडून केली जाणार आहेत. पहिल्यांदाच शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षासोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजप पक्षाकडून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये वादाची ठिणगी पाडण्याचा प्रयत्न करु शकतो. तर अधिवेशनात विरोधीपक्ष नेत्यांची निवड केली जाणार आहे.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 97 आमदार हे प्रथमत:च निवडून आले आहेत, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन खास असणार आहे. नागपूर करारानुसार, हिवाळी अधिवेशनात केवळ विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र फक्त सहा दिवसांत नक्की काय आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची याबाबत ठाकरे सरकारचा परीक्षा असणार आहे. अधिवेशनाच्या आधी सहा जणांचे खातेवाटप ठाकरे सरकारकडून करण्यात आले आहे.

Protected Content