बहूजन समाज पक्षाने जाहीर केली लोकसभेसाठी पहिली यादी

लखनऊ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी बहूजन समाज पक्षाने १६ उमेदवारांची घोषणा केली आहे. ही सर्व नावे उत्तर प्रदेशातील मतदारसंघातील उमेदवारांची आहे.

यामध्ये सहारनपूरमधून माजिद अली, मुझफ्फरनगरमधून दारा सिंग प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंग, नगीनामधून सुरेंद्र पाल सिंह, मुरादाबादमधून इरफान सैफी, केरानामधून श्रीपाल सिंह, रामपूरमधून झीशान खान, संभलमधून शौलत अली, आंवलामधून आबिद अली, पिलीभीतमधून अनिल अमहद खान उर्फ फुलबाबू, अमरोहामधून मुजाहिद हुसेन, मेरठमधून देवव्रत त्यागी, बागपतमधून प्रवीण बन्सल, गौतम बुद्ध नगरमधून राजेंद्रसिंह सोळंकी, बुलंदशहरमधून गिरीशचंद्र जाटव, शहाजहानपूरमधून दोद्रम वर्मा यांचा समावेश आहे. या उमेदवारांमध्ये ७ मुस्लीम समाजाचे आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. या सर्व जागांवर बसपप्रमूख मायावती यांनी कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Protected Content