अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर पकडले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावाजवळील कब्रस्तानजवळून बेकायदेशीरपणे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरवर भुसावळ महसूल पथकाने शनिवारी कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर शनिवार २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावातील कब्रस्तान परिसरातून डंपरमधून गौण खनिजाची विनापरवानगी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार महसूल पथकाने शनिवार २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कारवाई करत विना क्रमांकाचे डंपर पकडले. दरम्यान गौण खनिज वाहतूक करण्याबाबत कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. याप्रकरणी तलाठी माधुरी विक्रम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालक आणि मालक अन्वर सुलेमान गवळी रा. कन्हाळा ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभान तडवी हे करीत आहे

Protected Content