ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पदवी प्रदान समारंभ खरं तर फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर केला जातो. पण पुर्व प्राथमिकचा हा छोटा बालवर्ग पूर्व प्राथमिक मधून प्राथमिकमध्ये पदार्पण करीत असताना त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अभिनव उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात आला.

यावेळी एकूण १०३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका प्राचार्य नीरज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महत्त्व वर्गशिक्षिका मंगला चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व पालकांचे देवयानी पाटील यांनी आभार मानले. सूत्र संचालन ज्योत्स्ना पाटील आणि महिमा भदाने यांनी केले.

Protected Content