रासप नेते महादेव जानकर यांना महायूतीने दिली एक जागा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या जागावाटपावरून अनेक बैठका मुंबई-दिल्लीत होत आहेत. अशातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीने लोकसभेची एक जागा दिली जाणार अशी घोषणा केली आहे. ही घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. आता राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीमध्येच राहणार आहेत.

महायुतीत असतानाही महादेव जानकर यांनी भाजपवर छोटया पक्षांवर दुर्लक्ष करण्याचा आरोप करत टीका केली होती. परंतू आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित त्यांना लोकसभेची एक जागा देण्यात आली. महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Protected Content