रस्त्यावरील खड्ड्यात वेगाने जाणारी कार अडकली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्रा चौकात असलेल्या मथुथ फायनान्स कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात भरधाव कार अडकल्याची घटना रविवार २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील चित्रा चौक जवळील मुथुत फायनान्सच्या कार्यालयासमोर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून गटार मोकळी करण्यासाठी खड्डा तयार करण्यात आला आहे. यात गटारीचे काम सुरू होते. काम करतांना खड्ड्याजवळ महापालिकेच्या प्रशासनाने कोणतेही सुचना फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे रविवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वेगाने जात असलेल्या कार क्रमांक (एमएच १५ एफएफ १०८९) चित्रा चौकाकडून गोलाणी मार्केटकडे येत असतांना कार थेट खड्ड्यात अडकली. सुदैवाने कारमधील कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतु कारचे पुढच्या भागाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या घटने प्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content