दोन वरिष्ठ सहायक लाच प्रकरणात दोषी ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले बडतर्फीचे आदेश

notice to the jalgaon zp ceo 20180588764

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील जामनेर व रावेर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या दोन वरिष्ठ सहायक यांच्यावर लाच घेतल्याचा ठपका सिद्ध झाल्याने त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी बुधवारी दिले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असताना विनायक वंनजी बैसाणे यास २१ सप्टेंबर २०१५ रोजी लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव न्यायालयात त्याच्याविरुध्द खटला सुरु होता. त्यास ४ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १ हजार रुपये दंड अशी जळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली. ते सध्या जामनेर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. तर रावेर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला चाळीसगाव येथे २० जुलै २०१५ रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध जळगाव न्यायालयात खटला सुरु होता. त्यास ४ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १ हजार रुपये दंड,दंड न भरल्यास साधी कैद अशी जळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. या दोघ वरिष्ठ सहाय्यकांना जळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांच्यावर बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या दोघांना जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी बुधवारी बडतर्फ केले.

Protected Content