बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह विहिरीत आढळला; रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लक्ष्मी नगरात राहणारा ३२ वर्षीय तरूण हा शनिवार ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजेपासून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह कासमवाडीतील विहरीत आढळून आल्याची घटना मंगळवार २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भूषण भोळे हा तरूण जळगाव शहरातील लक्ष्मी नगरात वास्तव्याला होते. शनिवार ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्यांनी घरात कुणाला काहीही न सांगता तो घरातून निघून गेले. याबाबत रविवारी ३१ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कासमवाडी येथील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

आत्महत्या आहे की विहिरीत पडले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुकेश पाटील, नितीन ठाकूर, ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अंगावरील कपडे, बोटातील अंगठी आणि गळ्यातील तुळशीमाळ यावरून मयताची ओळख पटविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रतिलाल पवार हे करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Protected Content