महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पुर्ण करेल- तुषार पाटील

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राजकीय नाराजीचे नाट्य घडवून आणले आहे. महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकाळ पुर्ण करेल असे विश्वास शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

ते म्हणाले की, राज्याचे उत्कृष्ठ कार्य करणारे व संयमी अशी राजकारणात आपली ओळख निर्माण करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य हे अनेक संकटांवर मात करून प्रगतीपथावर आलेले असतांना राज्यातील काही एकनाथ शिंदे सारखी सत्तेसाठीची स्वार्थी राजकारणी नाराजीचे नाटय घडुन आणीत ही मंडळी राज्यातील महाविकास आघाडीचे शासन अस्थिर करुन राज्यात सध्या पक्षतोड फोडीचे गल्लीच्छ राजकारण खेळले जात असुन तरी देखील आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे शिवसेनेचे आमदार हे या राजकारणाला बळी न पळता लवकरच स्वगृही परततील, असा विश्वास शिवसेनेचे एकनिष्ठ असे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील (मुन्नाभाऊ) यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला असुन राज्यातील महाविकास आघाडी शासन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपले कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास ही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!