बारा वर्षवयोगटावरील मुलांचे लसीकरण खोळंबले

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यासह राज्यात १२ ते १४ वयोगटातील मुलामुलींसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार होती. त्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु लस मात्रेचा पुरवठा उपलब्ध न झाल्याने बुधवारी लसीकरणास सुरुवातच होऊ शकली नसल्याने बारा वर्षवयोगटावरील मुलांचे लसीकरण खोळंबले असल्याचे प्रशासन सूत्रांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी १६ जानेवारीपासुन संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्राथमिक स्तरावर आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स तसेच ६० वर्ष वयोगटातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ४५ ते ६०, १८ ते ४५ तर ३ जानेवारीपासुन १५ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीनासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. या नागरिकांसाठी कोविशिल्ड, कोवक्सीन या लसमात्रेचा पुरवठा करण्यात आला होता.

१२ वर्ष वयोगटासाठी ‘कोर्बीवेक्स’

त्यानंतर बुधवार १६ मार्चपासून १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मुलांसाठी कोविशिल्ड, कोवक्सीन ऐवजी कोर्बीवेक्स हि लस दिली जाणार आहे. प्रशासनाकडून या लसीकरणासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती, परंतु लस मात्राच उपलब्ध न झाल्याने बारा वर्षवयोगटावरील मुलांचे लसीकरण खोळंबले असल्याचे बुधवारी १६ मार्च रोजी दिसून आले.

जिल्ह्यात लसीकरण पात्र लोकसंख्या सुमारे ३६ लाख, ३२ हजार ४९८ आहे. त्यापैकी २९ लाख नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील तर २१  लाखांचे वर  दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झाले आहे. यात १५ ते १७ वर्ष वयोगटातील किशोरवयीनाची संख्या २ लाख २५ हजार ८९८ असून आतापर्यत १ लाख३१  हजार  किशोरवयीनाना पहिल्या टप्प्यातील लसीकरण लाभ देण्यात आला असून 3 जानेवारी रोजी किशोरवयीनांसाठी पहिल्याच दिवशी सुमारे ४५ हजार लस मात्र उपलब्ध करून देण्यात आली होती. असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

तर दुसरीकडे जिल्ह्यात बुधवार १६ मार्च पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरु करण्याचे नियोजन होते. मात्र लस मात्र उपलब्ध न झाल्याने या बालकांच्या लसीकरणाचे नियोजन पूर्णता कोलमडले.

Protected Content